You are currently viewing विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेसाठी सदैव तत्पर राहावे – सायली चव्हाण

विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परीक्षेसाठी सदैव तत्पर राहावे – सायली चव्हाण

मालवण

व्यक्तिमत्व विकास, इंग्रजीतून संवाद कौशल्य, चतुरस्त्र वाचन पुढील शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने आवश्यक असून विद्यार्थ्यानी त्याचा अंगिकार करून आपल्यातील गुण विकसित करावे व स्पर्धात्मक परीक्षेसाठी सदैव तयार राहावे असे आवाहन सायली चव्हाण यांनी बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे गुणवंतांचा सत्कार प्रसंगी बोलताना केले.
मालवण तालुक्यातील कट्टा दशक्रोशीतील हायस्कूल मधील १० वी १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बॅ नाथ पै सेवांगण कट्टा यांच्यावतीने ध्यास फाऊंडेशनचे संस्थापक तथा सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक सुरेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सायली चव्हाण यानी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. यावेळी रश्मी पाटील, किशोर शिरोडकर, भास्कर आकेरकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रोटरीयन रश्मी पाटील यानी आपल्या आयुष्यातील काही प्रसंग सांगून त्यावर कशी मात केली याची उदाहरणे मुलाना दिली. जिदद् , अभ्यास व मेहनत घेऊन मुलानी आपली गुणवत्ता टिकवून ठेवावी असं आवाहन त्यानी विद्यार्थ्याना केले. किशोर शिरोडकर यानी इंग्रजीचे ज्ञान अगदी पहिली पासून वेगळ्या पद्धतीने मुलाना शिकवणे आवश्यक असून त्यासाठी पालकाना मार्गदर्शन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. निवृत्त मुख्याध्यापक भास्कर यांनीही मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा