You are currently viewing जितेंद्र आव्हाड यांचे सिंधुदुर्गात होणार जंगी स्वागत…

जितेंद्र आव्हाड यांचे सिंधुदुर्गात होणार जंगी स्वागत…

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयामध्ये माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रतोत तसेच विरोधी पक्ष नेते जितेंद्र आव्हाड यांचा मंगळवारी कुडाळ येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मेळाव्याच्या दौऱ्यानिमित्त जिल्हाध्यक्ष अमित सामंत तसेच कोकण विभाग महिला अध्यक्ष सौ अर्चनाताई घारे परब यांच्या सूचनेनुसार सावंतवाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयात सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दौरा नियोजन बैठक घेण्यात आली.

यावेळी बांदा कट्टा येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येईल त्यानंतर आव्हाड साहेब सावंतवाडी शहर मार्गे कुडाळ जात असल्याने सावंतवाडी शहरात सावंतवाडी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जयप्रकाश चौक सावंतवाडी येथे भव्य स्वागत करण्यात येणार आहे व त्यानंतर कुडाळ येथील मेळाव्यास मार्गक्रमण होणार आहेत. अशी माहिती देत या स्वागतास व मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना मानणारा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भाई भोसले तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायतल्ला खान महिला जिल्हाध्यक्ष एडवोकेट रेवती राणे जिल्हा उपाध्यक्ष असिफ शेख जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्यांक इफ्तेकार राजगुरू जिल्हा उपाध्यक्ष उद्योग व्यापार आशिष कदम ज्योती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर महिला शहराध्यक्ष एडवोकेट सायली दुभाषी अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख जहूर खान संजय पालव महिला तालुका सदस्य सौ मारीता फर्नांडिस ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सिद्धेश तेंडुलकर जिल्हा कार्यकारणी सदस्य अगस्तीन फर्नांडिस प्रशांत पांगम समीर सातार्डेकर वि जे एनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार तालुका चिटणीस काशिनाथ दुभाषी अल्पसंख्यांक महिला पदाधिकारी सौ राबिया आगा-शेख तालुका उपाध्यक्ष उद्योग व्यापार याकुब शेख तालुका सदस्य प्रकाश म्हाडगुत उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा