You are currently viewing कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना बंधू शोक

कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना बंधू शोक

कणकवली :

 

कणकवली शहराचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे बंधू सचिन अनंत नलावडे ( वय – ४९ रा. कणकवली ) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांची प्रकृती अस्वस्थमुळे त्यांना पडवे येथील लाईफटाईम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड होत गेल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

सचिन यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, मुलगा, पुतणे, तीन विवाहित बहिणी, असा मोठा परिवार आहे. काही वर्षे त्यांनी अलंकार भोजनालय चालवले होते. त्यांच्यावर आज कणकवलीतील मराठा मंडळ नजीकच्या स्मशानभूमीत दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =