You are currently viewing गांगो मंदिरनजीक गटारात डंपर रुतल्याने वाहतूक कोंडी…

गांगो मंदिरनजीक गटारात डंपर रुतल्याने वाहतूक कोंडी…

गांगो मंदिरनजीक गटारात डंपर रुतल्याने वाहतूक कोंडी…

कणकवली

शहरातील सर्व्हिस रोडलगत असलेल्या गटारावर डंपरचे चाक रुतल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली. हा प्रकार गांगो मंदिरनजीक शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडला. डंपर बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

गांगो मंदिरनजीक इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी लागणारे साहित्य डंपरमधून आणले होते. ते साहित्य उतरवत असताना डंपरचे चाक सर्व्हिस रोडलगत असलेल्या गटारात रुतले. डंपरचा दर्शनी भाग रोडवर आल्याने वाहतूक कोंडी झाली. अखेर वाहतूक पोलीस विनोद चव्हाण यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी जात नागरिकांच्या मदतीने रुतलेला डंपर बाजूला करत वाहतूक पूर्ववत केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × three =