You are currently viewing कणकवली शिवशक्ती नगर येथे झालेल्या एसटी व स्कूटर अपघातात दोन जणांचा मृत्यू

कणकवली शिवशक्ती नगर येथे झालेल्या एसटी व स्कूटर अपघातात दोन जणांचा मृत्यू

कणकवली

कनेडी भटवाडीहून कणकवलीच्या दिशेने जाणारी एसटी बस क्रमांक एम एच २० बी एल ३८८० ला समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच ०९ एइ ९५७० वरील दुचाकी स्वाराने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी वरील एक युवक जागीच ठार झाले. तर दुचाकी वर मागे बसलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराला साथ न देता त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५:३० वाजता घडला.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाकडे सायंकाळी ४:३० वा. च्या सुमारास आले होते. यावेळी या दोघांमध्ये जोरदार वाद झाले होते. बराच काळ ते वादावादी करत असल्याने स्थानिक रिक्षा चालक यांनी त्यांना घरी जाण्याची सूचना केली. त्यामुळे दोघेही दुचाकीवरून भरधाव वेगात हरकूळच्या दिशेने निघाले. दरम्यान दुचाकी चालक सागर मारुती घाडीगावकर ( वय २७ , राहणार हरकुळ बोंडकवाडी ) याच्या डोक्याला जोरदार धडक बसल्याने गंभीर दुखापत होऊन तो जागीच गतप्राण झाला तर सुनील सूर्यकांत ठाकूर ( वय ४५, राहणार हरकुळ काळेथरवाडी ) यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यामुळे तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी उपचार सुरू केल्यानंतर उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सागर मारुती घाडीगावकर यांच्या पश्चात आई व विवाहित बहीण आहे तर सुनील सूर्यकांत ठाकूर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, असा परिवार आहे. दोघांनाही मयत घोषित केल्यानंतर याबाबत कणकवली पोलिसांना माहिती देण्यात आली.

यावेळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळी, पोलीस निरीक्षक अमित यादव, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, विनायक चव्हाण, वृषाली बर्गे, किरण मेथे, मंगेश बावदाने, किरण कदम आधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले व घटनेचा पंचनामा करत दोघांचेही शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया सुरू होती.

घटनेची माहिती मिळताच गोट्या सावंत, हरकुळ सरपंच बंडू ठाकूर, बुलंद पटेल, राजू पेडणेकर, नित्यानंद चिंदरकर, अनिल खोचरे, मिलिंद मेस्त्री, समीर ठाकूर, मनीष ठाकूर, पोलीस पाटील संतोष तांबे व ग्रामस्थ दाखल झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा