You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण येथील जि.प. विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी १५ लाख रु मंजूर

आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण येथील जि.प. विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी १५ लाख रु मंजूर

*आ. वैभव नाईक यांच्या प्रयत्नांतून मालवण येथील जि.प. विश्रांतीगृहाच्या नूतनीकरणासाठी १५ लाख रु मंजूर*

*आरसेमहाल, जि.प. व सा.बां. विश्रांतीगृहाच्या कामांची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी*

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हापरिषद सेस फंडातून मालवण बंदर जेटी नजीक असलेल्या जिल्हा परिषद विश्रांतीगृहाच्या नुतनीकरणासाठी १५ लाख रु मंजूर झाले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यात मालवण तालुका अग्रेसर आहे. याठिकाणच्या पर्यटनात वाढ करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांचे प्रयत्न सुरु आहेत. मालवण बंदर जेटी नजीक असलेले जि.प. चे विश्रांतीगृह नादुरुस्त असल्याने त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याची मागणी आ. वैभव नाईक यांनी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली त्यानुसार या कामासाठी १५ लाख रु मंजूर करण्यात आले आहेत.
याआधी आ. वैभव नाईक यांनी मालवण मधील प्रसिद्ध आरसेमहाल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीसाठी देखील कोट्यावधींचा निधी मंजूर करून आणला असून प्रत्यक्षात हि कामे सुरु आहेत. आ. वैभव नाईक यांनी बुधवारी या तिन्ही कामांची पाहणी केली. यावेळी अधिकारी व ठेकेदार यांना आवश्यक सूचना त्यांनी केल्या.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, उपशहरप्रमुख सन्मेष परब,तपस्वी मयेकर, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. सावर्डेकर, शाखा अभियंता श्री. मगर व श्री. पवार, सिद्धेश मांजरेकर, करण खडपे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा