You are currently viewing यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार आर. जे. पवार यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा.!

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार आर. जे. पवार यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा.!

यलो अलर्टच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार आर. जे. पवार यांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा.!

कणकवली :

कणकवली तालुक्यात कालपासून संततधार पाऊस सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी देखील झाली. त्यामुळे पुढील ७, ८ आणि ९ जुलै रोजी यलो अलर्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याला अलर्ट केल्याने कणकवली तहसीलदार आर. जे. पवार यांनी कणकवली तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ,७, आणि ९ जुलै यलो अलर्ट जिल्ह्याचे जिल्हाधि जारी केले आहे. आज सकाळ पासुन रिमझिम पाऊस सुरू असून कणकवली तालुक्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. पाऊस सूरू असताना नदी – नाल्यात परीसरात जावू नका. अचानक येणाऱ्या पावसात तसेच पाण्याच्या ठिकाणी थांबू नका, असं आवाहन कणकवली तहसीलदार आर जे पवार यांनी नागरिकांना केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा