You are currently viewing २४ तास – ५१,४२२ जणांचा सहभाग – क्षणोक्षणी बदलत जाणारा व्होटिंग पोल आणि अखेर..

२४ तास – ५१,४२२ जणांचा सहभाग – क्षणोक्षणी बदलत जाणारा व्होटिंग पोल आणि अखेर..

*२४ तास – ५१,४२२ जणांचा सहभाग – क्षणोक्षणी बदलत जाणारा व्होटिंग पोल आणि अखेर..….*

*न्यूज एरेना इंडिया पोलच्या सर्व्हेमध्ये महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर “द बेस्ट प्रेसिडेंट” चा जनमताचा शिक्कामोर्तब झाला*

कालपासून सुरू झालेल्या या जनतेमधील सर्व्हेचा निकाल आज एक वाजता जाहीर झाला. तब्बल २३१४० मते मिळवत महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनाही लोकप्रियतेत मागे टाकले. अण्णामलाई २१०८३ मते मिळवत दुसऱ्या स्थानी राहिले. दोन ते चार टक्के सतत कधी पाठी कधी पुढे अशी सतत २४ तासात दोघांमध्ये चाललेल्या “काटे की टक्कर”ला पूर्णविराम मिळाला तेव्हा तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांना एकूण मतांच्या ४१ टक्के तर महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे यांना ४५ टक्के मते मिळाली होती. “न सोऊंगा न सोने दुन्गा” अशा कार्यपद्धतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड लोकप्रियता लाभलेल्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांची “सर्वोत्तम प्रदेशाध्यक्ष” म्हणून न्यूज एरेना इंडियाकडून निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जल्लोष करत आनंद व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + 7 =