You are currently viewing राज्यस्तर स्वच्छ्ता मूल्यमापनासाठी उद्यापासून सुरुवात

राज्यस्तर स्वच्छ्ता मूल्यमापनासाठी उद्यापासून सुरुवात

जिल्ह्यातील १५ ग्राम पंचायतींचा समावेश

ओरोस

स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामिण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे नामांकण राज्य व केंद्र स्तरावर होणार आहे. या अंतर्गत राज्यस्तर तपासणी करीता तपासणी समिती 5 जुलै रोजी जिल्ह्यात दाखल होत असुन जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा पाणी व स्वच्छत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीविनायक ठाकुर यांनी दिली आहे.

स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023 अंतर्गत ग्रामपचायतीची तपासणी तीन गटात करण्यात येणार आहे. यामध्ये 2000 पर्यत लोकसंख्या असणा-या ग्रामपंचायती, 2000 ते 5000 लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायती, व 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असणा-या ग्रामपंचायती असा निकष ठेवण्यात आला आहे. तालुकास्तरावरुन प्रत्येक गटातील पाच ग्रामपंचायतीची जिल्हास्तराकरीता निवड करण्यात आली होती. जिल्हास्तरीय समितीने जिल्ह्यातील तालुकास्तरावरुन निवड केलेल्या ग्रामपंचायती पैकी वरिल तीन गटात प्रति गट पाच या प्रमाणे 15 ग्रामपंचायतीची राज्यस्तराकरीता निवड केली आहे. या निवडी करीता ऑनलाईन प्रणालीवर एक प्रश्नावली केंद्र शासना कडुन तयार करयात आली होती. याच प्रणालीच्या माध्यमातुन तालुका व जिल्हास्तराची तपासणी पुर्ण करण्यात आली आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत साडपाणी घनकचरा व्यवस्थापन व हागणदारी मुक्त अधिक या विषयावर ऑनलाईन 500 मार्कची प्रश्नावली ऑनलाईन प्रणालीवर तयार करण्यात आली होती.
स्वच्छ सर्वेक्षण ग्रामिण 2023 अंतर्गत देवगड तालुक्यातील दाभोळे व बापर्डे, कणकवली तालुक्यातील लोरे, कोळोशी, कलमठ, मालवण तालुक्यातील गोळवण, कुडाळ तालुक्यातील कसाल, कुंदे व माणगाव, वेंगुर्ला तालुक्यातील परुळेबाजार, उभादांडा, दोडामार्ग तालुक्यातील कुंब्रल, सावंतवाडी तालुक्यातील निरवडे, मळेवाड तर वैभववाडी तालुक्यातील सडूरे ग्रामपंचायतीची राज्यस्तर तपासणी करीता निवड करण्यात आली आहे. 5 जुलै 2023 ते 8 जुलै 2023 या कालावधीत जिल्ह्यातील निवड झालेल्या ग्रामपंचायतीची राज्यस्तराकरीता तपासणी होणार आहे. अशी माहिती विनायक ठाकुर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा