You are currently viewing दोडामार्ग पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षकांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून स्वागत..

दोडामार्ग पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षकांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून स्वागत..

दोडामार्ग

दोडामार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी अरुण पवार हे पोलीस निरीक्षक म्हणून रुजु झाले आहेत. त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोडामार्ग च्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. दोडामार्ग तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालून सामाजिक ऐक्य कायम ठेवण्यास आपण चांगले काम करावे यासाठी दोडामार्ग तालुक्यात आपले स्वागत असल्याचे यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस म्हणाले.

यावेळी तालुकाप्रमुख संजय गवस, युवासेना तालुका प्रमुख मदन राणे, महिला आघाडी पदाधिकारी जेनिफर लोबो, उपतालुकाप्रमुख मिलिंद नाईक, विजय जाधव, ओंकार कुलकर्णी, लक्ष्मण आयनोडकर, शिवराम मोरजकर, भिवा गवस आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + two =