You are currently viewing कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फ्रॅक्चर शस्त्रक्रिया टेबल, नसल्याने शस्त्रक्रिया रखडल्या : महेश गुरव

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फ्रॅक्चर शस्त्रक्रिया टेबल, नसल्याने शस्त्रक्रिया रखडल्या : महेश गुरव

कणकवली :

कणकवली रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांपासून फ्रॅक्चर रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑपरेशन टेबल नादुरुस्त झाले आहे. या ऑपरेशन टेबलच्या मागणीसाठी कणकवली रुग्णालय अधीक्षकांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना 7-8 वेळा पत्रव्यवहार करून देखील दुर्लक्ष केला आहे.गेल्या आठ दिवसापासून एक महिला व अन्य रुग्ण शस्त्रक्रिये साठी उपजिल्हा रुग्णालयात अडकून पडले आहेत त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी शस्त्रक्रिया टेबल न दिल्यास कणकवली भाजपच्यावतीने घेराव घालणार असल्याचा इशारा सरचिटणीस, माजी सभापती महेश गुरव यांनी दिला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय कोवीड रुग्णालय जाहीर झाल्यापासून गेले पाच महिने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील रुग्ण उपचार घेण्यासाठी येत आहेत.त्यामुळे इलेक्ट्रॉनिक ऑटोमॅटिक ऑपरेशन टेबल बंद असल्याने काम करता येत नाही.अनेक रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून उपचारासाठी कणकवलीत पाठवण्यात येते.सध्याच्या परिस्थितीत एकीकडे रुग्न कोरोनाच्या संकटामुळे भीती खाली आहेत.त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ऍडमिट करून ठेवल्यामुळे अजून भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. दारूम येथील महिला वनिता मारुती तळेकर या फ्रॅक्चर झालेल्या ऑपरेशनसाठी गेल्या आठ दिवसापासून उपजिल्हा रुग्णालयात ॲडमिट आहेत.यासंदर्भात रुग्णालय अधीक्षकांशी संपर्क साधल्यानंतर ऑपरेशन करण्यासाठी आवश्यक असणारे टेबल नसल्याचे सांगत आहेत.जिल्हा शल्यचिकित्सकांनी जिल्हा रुग्णालयातील इलेक्ट्रॉनिक ऑपरेशन टेबल तात्पुरते कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला द्यावे रुग्णांची गैरसोय थांबवावी अन्यथा कणकवली भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेराव घालणार असल्याचा इशारा महेश गुरव यांनी दिला आहे.

फ्रॅक्चर शस्त्रक्रिया करण्यासाठी असलेले ऑटोमॅटिक टेबल रिपेअर किंवा नवीन यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांना 7- 8 वेळा पत्रव्यवहार केले आहेत. संबंधित रिपेरिंग करणारी कंपनी येऊन देखील ते टेबल रिपेअर झाले नाही.त्यामुळे फ्रॅक्चर रुग्णांची गैरसोय होत आहे याची जाणीव जिल्हा शल्य चिकित्सक यांनी ठेवावी. ओरस रुग्णालयातून देखील फ्रॅक्चर रुग्ण कणकवलीत पाठवण्यात येत आहेत. त्या सर्वांचा विचार करून योग्य तो निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी महेश गुरव यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 15 =