You are currently viewing पारिजात, मुंबईचा “बॅक टू स्कूल” उपक्रम

पारिजात, मुंबईचा “बॅक टू स्कूल” उपक्रम

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरच्या निर्मळ हास्यात आपलं समाधान मानणार्‍या आणि त्यांच्या जीवनात पारिजातकाप्रमाणे सुगंध पसरवणार्‍या “पारिजात, मुंबई” यांच्यासाठी रविवार २ जुलै २०२३ हा दिवस खूपच महत्वाचा होता. महाराष्ट्रासह मुंबईतही पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना काळाचौकी येथील शिवाजी विद्यालयाच्या सभागृहात पारिजातचे कार्यकर्ते आपल्या कुटुंबियांसह संपूर्ण दिवसभर रमले होते आपल्या “बॅक टू स्कूल” ह्या उपक्रमासाठी ग्रामीण गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेपयोगी वस्तूंचे पॅकिंग करण्यात.

महाराष्ट्रभरातून अनेक दानवीरांचा हात या उपक्रमाला गेली १० वर्षांपासून लागत आहे. महाराष्ट्रातील १७ जिल्हे त्यातील ६० शाळा आणि गरजू विद्यार्थांचा शोध घेणे. त्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणे जणू पारिजातच्या कार्यकर्त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यांच्या ह्या उपक्रमाला नाट्य-चित्रपट क्षेत्रातल्या स्पृहा जोशी, प्राजक्ता माळी, ऋतुजा बागवे, आरती मोरे, प्रल्हाद कुडतरकर, शशिकांत केरकर, क्षितीश दाते अशा अनेक गुणी कलाकारांनी पाठबळ दिलेलं आहे.

त्यांच्या ह्या उपक्रमाला समाजातील विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी भेट देऊन त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. त्यात माजी नगरसेवक दत्ताराम पोंगडे, माजी नगरसेवक सचिन पडवळ, काळाचौकी पोलीस स्टेशनच्या पीएसआय संजीवनी इंगळे, पीएसआय सोनाली पाटील, पोलीस हवालदार अर्चना चव्हाण, एपीआय राकेश गवळी, समाजसेवक डॉ. प्रागजी वाजा, सृष्टी बाळा नांदगावकर, मिसेस ब्युटीफुल स्माईल २०२० अलका सपकाळे, लोकमान्य मालिकेचे दिग्दर्शक स्वप्नील वारके, सचिन तेंडुलकरांचे जबरा फॅन डॉ. अभिषेक साटम आणि त्यांच्या धर्मपत्नी डॉ. हर्षदा साटम यांच्यासह अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन पारिजातच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

सदर उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी गुरुदास बाटे, स्वप्निल पाथरे, हर्षद ठाकरे, शशांक ठूकरूल, राहूल शिंदे, अस्मिता ठोसर,शिल्पा गंजी, तुषार कोठारे ,चेतन, भारती, विकी जयस्वाल, राजेश सारंग यांच्यासह शेकडो कार्यकर्ते अथक परिश्रम घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा