You are currently viewing कोलगाव येथे चालकाला ताबा सुटल्याने कार घुसली थेट शेडमध्ये

कोलगाव येथे चालकाला ताबा सुटल्याने कार घुसली थेट शेडमध्ये

सावंतवाडी

चालकाचा ताबा सुटल्याने कोलगाव येथे कार डान्टस यांच्या घरासमोरील शेड मध्ये घुसून अपघात झाला. यात संबंधित चालक किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कोलगाव चर्च समोर घडली. अपघात झाल्याचे लक्षात येताच त्या ठिकाणी ग्रामस्थांनी गर्दी केली. तर जखमीला येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा