You are currently viewing प्रा. रमाकांत गावडे यांचा राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मान..

प्रा. रमाकांत गावडे यांचा राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मान..

बांदा :

 

गोगटे – वाळके महाविद्यालयाचे प्राध्यापक रमाकांत सिताराम गावडे यांचा हरमल गोवा येथे माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर यांच्या हस्ते राष्ट्रीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी माझी केंद्रीय कायदा मंत्री वीरप्पा मोईली, गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनुर, कोल्हापूरचे महापौर राजू शिंगाडे, बेळगावचे खासदार अमरसिंग पाटील, अरविंद घट्टी, गुजरातच्या कोमल शर्मा, दिल्लीचे विशेष अभियंता जयराज लोंढे, बिदरचे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश मेघन्नावर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. गावडे यांना यापूर्वी मुंबई विद्यापीठाचा उत्कृष्ट एनएसएस कार्यक्रम अधिकारी पुरस्कार व महाराष्ट्र शासनाच्या करियर कट्टा या उपक्रमात उत्कृष्ट समन्वयक म्हणून पुरस्कार प्राप्त झाला आहे.

यावेळी त्यांच्यासोबत त्यांची शिक्षिका पत्नी सौ रेश्मा गावडे, भाऊ विजय गावडे उपस्थित होते. प्रा. गावडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, म्हैसुरी फेटा व कंटहार देऊन सन्मान करण्यात आला.

प्रतिक्रिया व्यक्त करा