You are currently viewing लघुशंकेसाठी गेला असता आंबोली दरीत कोसळून छत्तीसगड येथील शासकीय पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

लघुशंकेसाठी गेला असता आंबोली दरीत कोसळून छत्तीसगड येथील शासकीय पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू

आंबोली

लघुशंका करत असताना तोल जावून खोल दरीत कोसळल्याने छत्तीसगड येथील युवकाचा आंबोली येथे जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर घडली. मिथिलेश पॅकेट असे त्याचे नाव आहे. तो कर्नाटक येथील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या अन्य तीन सहकाऱ्यांसमवेत आला होता. त्यानंतर गोवा ते रायबाग असा प्रवास ते करीत होते. मात्र ते परतत असताना आंबोली घाटात ही दुर्दैवी घटना घडली.

यावेळी तो लघुशंकेसाठी आंबोली घाटात थांबला होता. यावेळी त्याचा पाय घसरला व तो थेट खोल दरीत कोसळला, असे सहकाऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान अचानक घडलेला प्रकार पाहून त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी शंभर नंबरवर संपर्क साधून पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्या ठिकाणी आंबोली दाखल झाले. त्यांनी खोल दरीत उतरून मिथिलेश याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती मिळतात सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके, प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस हवालदार दत्ता देसाई आदी सहका-यांनी त्या ठिकाणी धाव घेत सहकार्य केले. याबाबत उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान या प्रकारामध्ये कोणताही घातपात नसल्याचा प्राथमिक संशय आहे. तरीही आपण तपास करत आहे, असे पोलिस अधिकारी सोळंके म्हणाल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा