You are currently viewing गुरू महिमा

गुरू महिमा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री भारती महाजन रायबाग कर लिखित अप्रतिम लेख*

*गुरू महिमा*

*गुरूवीण नाही दूजा आधार*
*रडता पडता कोठे अडता*
*तोच नेतसे पार…*

गुरूची महती या काव्यपंक्तीत किती यथार्थतेने वर्णन केली आहे! संसाराच्या या भवसागरात यथेच्छ गटांगळ्या खात असतांना गुरु नावाच्या किनाऱ्याचा आपल्याला भरभक्कम आधार असतो.

प्रपंच करीत असतांना मन:शांती ढळण्याचे अनेक प्रसंग आपल्यापुढे उभे ठाकतात. *सुखे दु:खे समेकृत्वा* ही उक्ती आचरणात आणायला आपण काही साधू संत नसतो. राग, लोभ, द्वेषादी सगळे विकार आपणा ठायी ठासुन भरलेले असतात. अशावेळी जर आपली जीवननौका कुठे भरकटू लागली तर गुरूला शरण जावे म्हणजे मनाचा समतोल कसा साधावा हे उमजायला वेळ लागत नाही.

हे झाले प्रापंचिक समस्येवर उपाय…पण सार्वजनिक जीवनात जेव्हा धर्माधिष्ठित धार्मिक आचरण करण्याची वेळ येते तेव्हाही विविध गुरूंनी विविध मार्ग सांगितलेल्या नेमक्या कुठल्या मार्गावर चालावं असा संभ्रम पडतो. सर्वसामान्यांसाठी सर्वसंगपरित्याग केलेले कोणतेही दीक्षित साधू हे गुरुस्थानीच असतात. पण भक्तीचा मूळ उद्देश बाजूला राहून उपचारांवरच भर दिल्या जातो. परमेश्वर तर डोळे मिटून, मौन धारण करून निर्विकल्प, ध्यानस्थ अवस्थेत बसलेला असतो.

संगीतक्षेत्रात गुरुपौर्णिमेला आणि गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपला शिष्य आपल्यापेक्षाही मोठा झाला तर आपली गुरुदक्षिणा मिळाली या भावनेने हातचं न राखता तळमळीने शिकवणारे गुरु लाभणं म्हणजे शिष्याचं महत्भाग्यच. अशा सुयोग्य गुरूंकडे कठोर साधना करून कितीतरी गायक गायिका आपल्या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवत असतात.

आई-वडील हे तर आपले पहिले गुरू. अपत्यांवर सुसंस्कार करून त्यांना जीवन जगण्यायोग्य माणूस म्हणून घडवण्यासाठी आई-बाप जिवाचं रान करत असतात. त्यांच्या कष्टांची जाण ठेवून त्यांचा यथायोग्य आदर करणे ही त्यांच्यासाठी गुरुदक्षिणाच होय.

शाळा कॉलेजातील शिक्षक पुस्तकी ज्ञान देत असतात तर व्यवहारात भेटणारे अनेक व्यावसायिक, कर्मचारी आपल्या वर्तणुकीतून व्यवहारज्ञान शिकवत असतात. त्यांच्याप्रतीही आपल्या वर्तणुकीतून कृतज्ञता व्यक्त करणे उचित ठरते.

तर कधी कधी पाण्यातील कमळाप्रमाणे फक्त इतरांना उपदेश न करता प्रपंचात राहूनही किंवा स्वतःचा प्रपंच सोडून जो माणसात देव आणि माणुसकीला साधना, उपासना समजून परोपकाराद्वारे परमार्थ साधू पाहतो तो सुद्धा गुरुपदाला पोहोचलेला असतो.

*बोले तैसा चाले,* *त्याची वंदावी पाऊले*
*तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा*

या संतवाक्यात गुरुत्वाची लक्षणे सांगितली आहेत. हिऱ्याचे तेज त्याला पैलू पाडल्यावर वाढते, सोन्याला झळाळीही अग्नीत तापल्यावरच येते त्याप्रमाणे गुरुची पारख ही त्यांच्या विद्वत्तेवरून, आचरणावरून, तपस्येवरून करता येते.

ज्ञानदानाच्या सर्वच क्षेत्रात सजीव गुरुचं महत्व अबाधित आहे. पण आता सोशल मीडिया ते स्थान घेऊ पहात आहे. नव्हे, जवळजवळ त्याने ते घेतलंच आहे. मोबाईलच्या एका क्लिकवर जगातील कुठल्याही क्षेत्रातील ज्ञान क्षणभरात मिळवता येतं. लहान बालकापासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणालाही घरबसल्या थोड्याशा प्रयत्नांनी ते सहज उपलब्ध होतं. तेही कुठलीही गुरुदक्षिणा न देता…फक्त इथे कोणतं ज्ञान द्यावं हे गुरूच्या स्वाधीन नसुन भलबुरं काय मिळवावं हे सर्वस्वी शिष्याच्याच हातात असतं. आणि त्याचे चांगले वाईट परिणामही त्यालाच भोगावे लागतात.

अशावेळी निसर्ग हा लौकिक जगतातील सर्वात मोठा गुरु आहे असं वाटतं. भेदाभेदाच्या पलीकडे जाऊन, सर्वांना समान वागणूक देऊन कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा ते करत नाहीत. निसर्गातील झाडं, नदी, सागर, धरती, सूर्य, चंद्र, इ. घटक त्यांना नेमून दिलेलं कार्य मूक राहुन अव्याहतपणे करत असतात. ही त्यांनी आपल्याला दिलेली किती मोठी शिकवण आहे. पण त्यांच्या हतबलतेचा फायदा घेऊन मानवाने त्यांच्या कार्यात ढवळाढवळ केली तरच ते उग्र रूप धारण करतात आणि आपण मात्र निसर्ग का कोपला याचा विचार करत बसतो.

अशा या सर्वच गुरूजनांप्रती *सदैवच* आदर असावा. पण तो प्रतिनिधिक स्वरूपात व्यक्त करण्यासाठी आजचा हा दिवस… *गुरुपौर्णिमा*

भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
९७६३२०४३३४

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा