You are currently viewing राष्ट्रवादीचा कणकवलीत जल्लोष!

राष्ट्रवादीचा कणकवलीत जल्लोष!

राष्ट्रवादीचा कणकवलीत जल्लोष!

कणकवली –

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदार शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर अन्य ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आल्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते तथा माजी नगरसेवक अबीद नाईकांसह कार्यकर्त्यांनी पटवर्धन चौकात फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला.

यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, उपाध्यक्ष विलास गावकर, सुभाष उर्फ बाबू सावंत, अनीस नाईक, शहराध्यक्ष इम्रान शेख, उपशहराध्यक्ष अमित केतकर, गणेश चौगुले, केदार खोत, ग्रा. पं. सदस्य सतीश पाताडे, युवक राष्ट्रवादीचे कणकवली शहराध्यक्ष निशिकांत कडुलकर, बाळू मेस्त्री, राजू सावंत, नितीश सावंत यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते. ‘शरद पवार तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘अजित पवार तुम्ह आगे बढो हम तुम्हारे साथ है’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो’ अशी घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी करत पटवर्धन चौक दणाणून सोडला.

राष्ट्रवादी नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आमदार शिंदे – फडणवीस सरकारमध्ये समील झाले आहेत. अजित पवारांनी घेतलेला हा निर्णय योग्य आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून अन्यही ८ आमदारांनी मंत्रीपदाचे शपथ घेतली आहे. याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. राष्ट्रवादीचे पक्ष सत्तेत सहभागी झाल्याने माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांची उमेद वाढली असून पक्षाच्या माध्यमातून आम्ही अधिक जनतेची सेवा करणार आहोत. अजित पवारांच्या या निर्णयामुळे सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीत दोन गट पडणार नाही, असा विश्वास अबीद नाईक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten − five =