You are currently viewing फोंडाघाट कानडेवाडी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

फोंडाघाट कानडेवाडी येथे आषाढी एकादशी उत्साहात साजरी

फोंडाघाट

फोंडाघाट कानडेवाडी या ठिकाणी आषाढी एकादशी उत्सहात साजरी करण्यात आली. श्री.सुभाष कानडे यांचे स्वतःचे असे श्री.विठ्ठल मंदिर आहे. विठ्ठल मंदिरा बाबत त्यांनी माहिती दिली. त्यावेळी सुभाष कानडे यांनी सांगीतले की, आषाढी, कार्तीकी २५ वर्ष वारी केल्याने हुकुम घेवुन स्वतःच्या कुटुंबाच्या सहकार्याने विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर उभारले.
या मंदिरात विठ्ठल रुक्मिणीची  सुबक मुर्ती आहे. ११ मे२०२३ ला मुर्ती प्रतिष्ठापना झाली. शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री.संजय आग्रे यांनी सकाळी सपत्नीक पुजा केली. संध्याकाळी अजित नाडकर्णी यांनी दर्शन घेतले. श्री.सुभाष कानडे यांनी स्वागत केले. विठोबा रुक्मिणी मुर्ती पाहुन मन प्रसन्न झाले.अशी प्रतीक्रीया यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा