कासार्डे ज्यु.काॅलेजच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीम. सुलोचना खोत यांचे निधन

कासार्डे ज्यु.काॅलेजच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीम. सुलोचना खोत यांचे निधन

तळेरे

कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका श्रीमती सुलोचना भा.खोत (वय-७१) यांचे रविवारी दि.१५/११/२०२० रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास कराड जि. सातारा येथे प्रदिर्घ आजाराने निधन झाले आहे.
कासार्डे ज्यू.काॅलेजमध्ये श्रीम.सुलोचना खोत मॅडम हिंदी व मराठी विषयाच्या प्राध्यापिका म्हणून अध्यापन केले आहे.१३ वर्षांपूर्वीच त्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या होत्या.त्यांचे हिंदी व मराठी विषयावर असलेल्या विशेष प्रभूत्वामुळे विद्यार्थी वर्गात त्या लाडक्या प्राध्यापिका म्हणून परिचित असायच्या.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष परशुराम माईणकर, सरचिटणीस उपेंद्र पाताडे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्कुल कमिटी चेअरमन मधुकर खाडये,प्राचार्य राजेंद्र नारकर, तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
त्यांचा निधनाने विद्यार्थी वर्गातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात तीन भाऊ, तीन बहिणी, भाचे – भाची असा मोठा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा