You are currently viewing शंकर महादेव विद्यालय कुंभवडे शाळेत नवागातांचे स्वागत

शंकर महादेव विद्यालय कुंभवडे शाळेत नवागातांचे स्वागत

शंकर महादेव विद्यालय कुंभवडे शाळेत नवागातांचे स्वागत..

कणकवली

शंकर महादेव विद्यालय कुंभवडे येथे नवागातांचे स्वागत इयत्ता दहावीच्या सलग 21 वर्ष 100% निकाल लावलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच प्रशालेचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी श्री खरात काका यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार असा तिहेरी कार्यक्रम  प्रशालेच्या प्रार्थना हॉलमध्ये पार पडला.  यावेळी शंकर महादेव सावंत ग्राम विकास संस्थेचे अध्यक्ष  मार्गदर्शक आदरणीय खासदार श्री अरविंद सावंत साहेब हे अध्यक्ष असलेल्या जाणीव ट्रस्ट मार्फत आपल्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप झाले. तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व पुस्तक याचे वाटप झाले. यावेळी आदरणीय खासदार श्री अरविंद सावंत साहेब यांनी मी अध्यक्ष झाल्यापासून शंभर टक्के निकालाची परंपरा ही अबाधित आहे याचा अभिमान व कौतुक व्यक्त केले यावेळी संस्था सचिव श्री शशिकांत सावंत,शालेय समितीचे अध्यक्ष अँड श्री राजेंद्र रावराणे साहेब प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ अपूर्वा सावंत मॅडम, कुंभवडे गावच्या सरपंच सौ विजया कानडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमास सर्व शालेय विद्यार्थी पालक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थीत होते

प्रतिक्रिया व्यक्त करा