You are currently viewing सावली कादंबरीचे प्रकाशन संपन्न

सावली कादंबरीचे प्रकाशन संपन्न

पुणे (प्रतिनिधी) :

साईश इन्फोटेक अँड पब्लिकेशन्स, काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे आणि देव परिवार, पुणे यांच्या वतीने लेखक श्री. यशवंत देव लिखित सावली या कादंबरीचा प्रकाशन सोहळा श्रमिक पत्रकार संघाच्या कमिन्स सभागृहामध्ये नुकताच संपन्न झाला.

प्रमुख पाहुणे म्हणून अर्थ व सांख्यिकी संचालनालय महाराष्ट्र शासनाचे मा. सहसंचालक श्री.सुभाष थोरात, उद्घाटक म्हणून श्री राजा उर्फ श्रीनिवास भीमराव बुधिकोट हे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक , संत चित्रकार श्री. वि. ग. सातपुते ( विगसा) उपस्थित होते. तर काव्यानंद प्रतिष्ठान चे सचिव श्री. विवेकानंद पोटे यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. श्रीमती अरुणा वेलणकर यांनी यशवंत देव लिखित गणेश वंदना सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्ना अमृतकर आणि सविता कुंजीर यांनी संयुक्तरित्या केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठान,पुणे चे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनिल खंडेलवाल यांनी केले.

यशवंत देवांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीमती अरुणा वेलणकर यांनी यशवंत देवांचा साहित्यिक प्रवास उलगडून दाखवला.

काव्यानंद प्रतिष्ठान पुणे च्या वतीने सुनिल खंडेलवाल आणि विवेकानंद पोटे यांनी व राष्ट्रपती पोलीस पुरस्कार विजेते कवी श्री सीताराम नरके यांनी श्री यशवंत देवांचा शाल, श्रीफळ आणि पुस्तक देऊन सत्कार केला.

संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. माधुरी देव, नचिकेत देव, नीता देव, सचिन देव, प्राची देव व मंदार देशपांडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. नीता देव यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा