वंदे भारत एक्स्प्रेसचा कोकण रेल्वे मार्गावर प्रवास झाला सुरु..
गोवा ते मुंबई ताशी १२९ किमी वेगाने धावणार वंदे भारत
कणकवली
कोकण रेल्वे मार्गावर आज अत्याधुनिक वंदे भारत एक्सप्रेस धावली. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळ येथून ऑनलाइन हिरवा झेंडा दाखवला. या गाडीचे कणकवली रेल्वे स्थानकात दुपारी १ वाजता आगमन होताच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी झेंडा दाखवला व भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत केला.भारतीय जनता पार्टी, पंतप्रधान मोदी, केद्रीय मंत्री राणे,उपमुख्यमंत्री फडणवीस, आम.नितेश राणे यांचा जयजयकार करत घोषणांनी आसमंत दुमदुमून सोडला.
सिंधूगर्जना ढोल पथकाचा गजर,बुवा संतोष कानडे,प्रकाश पारकर,श्री मिराशी यांनी मोदी सरकारच्या विकासकामांचे गीत सादर केले.नव्या कोऱ्या रेल्वे गाडीचे उस्फूर्त स्वागत करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांनी उस्फूर्त गर्दी केली होती.
कणकवली येथे स्वागत करण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,कणकवली कणकवली उपविभागीय अधिकारी जगदीश कातकर,माजी आ.प्रमोद जठार,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर,महिला आघाडी अध्यक्षा संध्या तेरसे,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत,विधानसभा संयोजक मनोज रावराणे,तहसीलदार आर.जे.पवार, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, राजू हिर्लेकर, मिलिंद मेस्त्री,उपाध्यक्ष सोनू सावंत, महेश सावंत शहराध्यक्ष अण्णा कोदे,माजी सभापती दिलीप तळेकर, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, पंढरी वायंगणकर,स्वप्निल चिंदरकर,राजू गवाणकर,संजय कामतेकर,बंडू हर्णे, भाग्यलक्ष्मी साटम,लक्ष्मण घाडीगावकर,प्रकाश पारकर,सुरेश सावंत,नरेंद्र भाबल,समर्थ राणे आदींसह भाजपा कार्यकर्ते व रेल्वे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भोपाळमधून व्हिडीओ कॉन्फरन्ससिंगद्वारे मडगांव- मुंबई वंदे भारत ट्रेनचे झेंडा दाखवून या रेल्वे गाडीचे लोकार्पण केले.त्यासाठी गोवा -मडगांव येथे रेल्वे प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी केली होती.कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेस गणेशोत्सवाची ट्रेनची सर्व तिकीट हाऊस फुल्ल झाली आहेत. वंदे भारत ट्रेनला प्रवाशांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
या कार्यक्रमावेळी गोवा मडगांव येथे गोवा राज्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण,गोवा राज्याचे पर्यटन मंत्री रोहन खौटे, मडगांवचे आमदार दिगंबर कामत, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस्को सार्डिन्हा आदी मान्यवर उपस्थित होते .
ओडिसा मधील भीषण रेल्वे अपघातानंतर गोवा-मडगांव येथील नियोजित वंदे भारतच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.मात्र आज मंगळवार दि.२७ जुन २०२३ रोजी हा कार्यक्रम पार पडला आहे.
वंदे भारत मध्ये ५३० सीट आहेत.
वंदे भारत या बहुचर्चित ट्रेन मध्ये ८ बोगी (डब्बे) मध्ये एकुण ५३० सीट (आसन व्यवस्था) आहेत.त्यामध्ये १ बोगी एक्झिक्युटिव्ह व अन्य ७ बोगी चेअर कार आहेत.यामध्ये एक्झिक्युटिव्ह बोगीतील तिकीट दर रु.३३६० तर चेअर कार मधील तिकीट दर रू.१८१५ आहे.