You are currently viewing अर्चना घारे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू – खास. विनायक राऊत

अर्चना घारे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू – खास. विनायक राऊत

शिवसेनेसाठी जागा सुटल्यास प्रामाणिकपणे शिवसेनेला सहकार्य करावे

 

सावंतवाडी :

सावंतवाडीतील विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीच्या वाटाघाटीत राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास निश्चितच आम्ही तुम्हाला निवडून आणू, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी तिरोडा येथे व्यक्त केला. दरम्यान ही जागा शिवसेनेला सुटल्यास तुम्ही सुद्धा त्याच ताकदीने शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा. तुमचा योग्य तो मानसन्मान केला जाईल असे, त्यांनी सांगितले.

तिरोडा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे, जान्हवी सावंत, मायकल डिसोजा, सागर नाणोसकर, दर्शना बाबर-देसाई आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. राऊत पुढे म्हणाले, या ठिकाणी प्रवीण भोसले यांनी सावंतवाडी ची जागा अर्चना घारे यांच्या माध्यमातून लढविण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. परंतु महाविकास आघाडी करून सुरू असलेल्या वाटाघाटीत ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यास त्याचा आम्हाला निश्चितच आनंद होईल. आम्ही त्यावेळी अर्चना घारे यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, परंतु ही जागा शिवसेनेसाठी सुटल्यास त्यांनी प्रामाणिकपणे शिवसेनेला सहकार्य करावे. त्यांचा निश्चितच योग्य तो मानसन्मान केला जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + six =