बालदिना चे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेस चा उपक्रम…..

बालदिना चे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती काँग्रेस चा उपक्रम…..

शालेय विद्यार्थ्यांचा गौरव

राष्ट्रवादी युवती काँग्रेस, सिंधुदुर्ग यांचे तर्फे बालदिनाचे औचित्य साधून कु. विजय दिनेश तुळसकर (वय वर्ष आठ ) याचे 500 पर्यंत इंग्लिश मधून पाढे पाठ आहेत त्याबद्दल व त्याच्या तल्लख बुध्दीची दाद देण्याच्या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग युवती संघटनेने शाल, श्रीफळ तसेच शालेय उपयोगी भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार केला. तसेच त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यावेळी राष्ट्रवादि काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग च्या युवती जिल्हाध्यक्ष मीता प्रल्हाद परब, कार्याध्यक्ष संपदा वासुदेव तुळसकर, मयुरी मकरंद परब, ऋचा तुळसकर, सानिया तुळसकर या युवती उपस्थित होत्या. तसेच त्याचे आई वडील व बहिणी उपस्थित होते. विजय तुळसकर या इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाचे ५०० पर्यंत इंग्लिश मधून पाढे पाठ असून तो उत्तम हार्मोनियम वादक देखील आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा