You are currently viewing नांदगाव येथे कुक्कूटपालन प्रशिक्षण संपन्न….

नांदगाव येथे कुक्कूटपालन प्रशिक्षण संपन्न….

१३५ महिलांचा प्रशिक्षणात सहभाग

कणकवली
नांदगाव ग्रा.पं.च्या १४ वा वित्त आयोग अंतर्गत महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणे या योजने च्या निधीतून नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शुभांगी तंत्र प्रशिक्षण संस्था सिंधुदूर्ग यांच्या वतीने नुकतेच कुक्कूट पालन प्रशिक्षण घेण्यात आले. सदर प्रशिक्षणात एकून १३५ महिलांनी नाव नोंदणी केल्याने सदर प्रशिक्षण हे कोरोनाचे सर्व नियम पाळत प्रभागा नुसार घेण्यात आले. प्रभागा नुसार प्रशिक्षण दिल्याने सदर प्रशिक्षणासाठी एकाचवेळी होणारी गर्दी टाळता आली. यासाठी ग्रा.पं.व मोरजकर ट्रस्ट ने योग्य प्रकारे नियोजन करून प्रभागा नुसार महीलांना त्या त्या दिवशी सदर कुक्कूट पालन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणासाठी नांदगाव येथील पशुधन अधिकारी डॉ. कांबळे यांचे सहकार्य लाभून सर्वांना या संदर्भात परिपूर्ण माहीती दिली. सदर १३५ प्रशिक्षण घेणा-या लाभार्थ्यांना किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शुभांगी तंत्र प्रशिक्षण संस्था सिंधुदूर्ग या संस्थेतर्फे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षणातील लाभार्थ्यांना नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर यांच्या उपस्थीतीत प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी उपसरपंच निरज मोरये, ग्रामविस्तार अधिकारी पी.एन.हरमळकर, ट्रस्टचे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, उपाध्यक्ष भाई मोरये, ग्रा.पं.सदस्य अरूण बापार्डेकर, ईशा बिडये, वृषाली मोरजकर, रेणूका पाटील, सुनिता साळुंखे, रमिजान बटवाले आदी उपस्थित होते.

नांदगाव सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी सदर प्रशिक्षणाला मोठया प्रमाणात प्रतिसाद दिला तेव्हा या प्रशिक्षणातून उद्योग धंदे उभारून महीलांनीही सक्षम बनावे अशी अपेक्षा व्यक्त केली तर ऋषिकेश मोरजकर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी व्याज परतावा योजना सुरू करण्यात आली आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 2 =