You are currently viewing भाजप नेत्यांची मदत, व जनतेच्या  श्रमदानातुन  आंजिवडे रस्ता केला सुस्थितीत

भाजप नेत्यांची मदत, व जनतेच्या श्रमदानातुन  आंजिवडे रस्ता केला सुस्थितीत

बंद झालेल्या एसटी सेवा कुडाळ-आंजिवडे गावात पूर्ववत सुरू झाल्या

भाजप नेते, माजी खासदार निलेश राणे,विशाल परब यांनी दिला मदतीचा हात

माजी सभापती मोहन सावंत आणि भाई बेळनेकर यांच्या मेहनतीला यश

कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले आंजिवडे गाव आणि त्यात गावात सुरू असलेली एसटी बस रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बंद झाली. अखेर हा रस्ता स्थानिकांचे सहकार्य आणि भाजपाचे नेते विशाल परब यांच्या मदतीने तयार करून त्या रस्त्यावरून एसटी बस पूर्वक सुरू केली.गेले काही दिवस आंजिवडे गावाचा रस्ता खचल्याने एसटी सेवा बद झाली. लोकांना चालत जावे लागत होते. त्यांच्या हाकेला धावून जात. माजी.खाजदार निलेश राणे व भाजप चे युवा वेतृत्व विशाल परब यांच्या सहकार्याने ही लोकांची होणारी गैरसोय दूर केली गेली.त्यासाठी आंजीवडे गवळीवाडी व भाकरवाडी तील लोकांनी स्वतः काम करून या रस्त्यासाठी श्रमदान केले. त्यामुळे आज पुन्हा एखादा एसटी सेवा सुरू झाली आहे.

यावेळी सिंधुदुर्ग बँक संचालक प्रकाश मोर्ये , मोहन सावंत , भाई बेळणेकर ,राजा धुरी , सखाराम शेडगे , कृष्णा पंजारे , वासुदेव सकपाळ , मधुकर सकपाळ , आंजिवडे पोलीस पाटील नारायण पंजारे , व गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा