वेंगुर्ले
डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वेंगुर्ले भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी अभिवादन करताना राजन तेली म्हणाले की , प्रखर राष्ट्रवादी आणि भारतीय जन संघाचे संस्थापक असलेले डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांनी राष्ट्रीय ऐक्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली . त्यांनी एका देशात दोन विधान , दोन प्रधान व दोन निशान चालणार नाही अशी कणखर भुमिका घेतली व त्यातच त्यांना आपल्या जिवाचे बलिदान द्यावे लागले असे विचार मांडले .
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण , जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , नगराध्यक्ष राजन गिरप , महिला अध्यक्षा स्मिता दामले , जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा खानोलकर , जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल व बाळा सावंत , ता.सरचिटनिस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस व प्रीतेश राऊळ व संतोष गावडे , खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी , ता.चिटनीस जयंत मोंडकर व सुजाता देसाई , किसान मोर्चा चे बाळु प्रभु , अनु.जाती मोर्चा चे गुरुप्रसाद चव्हाण , महीला शहर अध्यक्षा प्रार्थना हळदणकर , शक्ती केंद्र प्रमुख गणेश गावडे – विजय बागकर – गोविंद मांजरेकर – सुधीर गावडे – संतोष शेटकर – कमलेश गावडे – आनंद गावडे , नगरसेवक प्रशांत आपटे व श्रेया मयेकर , अणसुर सरपंच सत्यविजय गावडे , परबवाडा उपसरपंच विष्णू उर्फ पपु परब , दादा केळुसकर , ओबीसी सेलचे शरद मेस्त्री , युवा मोर्चाचे नारायण कुंभार – भुषण सारंग – प्रीतम उर्फ पिंटु सावंत , महीला मोर्चाच्या रसिका मठकर – सुजाता पडवळ – आकांक्षा परब , बुथ प्रमुख रविंद्र शिरसाठ – निलेश गवस – पुंडलिक हळदणकर – नितीश कुडतरकर , संदिप देसाई , राजन पडवळ , गणपत गावडे , सुनील मठकर , अमित गावडे इत्यादी उपस्थित होते .