You are currently viewing हेदुळ येथे फळ प्रक्रिया प्रशिक्षण शिबीर..

हेदुळ येथे फळ प्रक्रिया प्रशिक्षण शिबीर..

फळ प्रक्रिया प्रशिक्षण शिबीराला महिलांचा भरघोस प्रतिसाद..

कसाल

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा परिषद सेस १० टक्के अनुदानातून महिलांना प्रशिक्षण यात फळ प्रक्रिया प्रशिक्षण शिबिर मालवण तालुक्यातील हेदुळ ग्रामपंचायत येथे घेण्यात येत आहे यात महिलांना फळ प्रक्रिया या विषयावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच फळ प्रक्रिया या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. पंधरा दिवस हे प्रशिक्षण शिबीर चालणार आहे. या फळ प्रक्रिया प्रशिक्षण शिबीराचा शुभारंभ हेदुळ सरपंच नंदू गावडे उपसरपंच सौ दर्शना पुजारे ग्रामसेवक सौ मनीषा पिळणकर ग्रामपंचायत सदस्य महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा