You are currently viewing देवगडात नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित लायसन्स काढून देण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

देवगडात नितेश राणे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आयोजित लायसन्स काढून देण्याच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

देवगड

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देवगड भाजपा युवा मोर्चा शहराच्यावतीने मोफत टु व्हिलर लर्निग ड्रायव्हिंग लायसन्स काढुन देण्याच्या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाबद्दल देवगड जामसंडे शहरामधील जनतेकडून भाजपा कार्यकर्त्यांचे आभार मानण्यात येत आहेत.
या कॅम्पचे उद्घाटन माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदिप साटम, तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,नगरसेवक शरद टुकरुल, शहराध्यक्ष दयानंद पाटील, माजी नगराध्यक्षा योगेश चांदोस्कर,नगरसेविका प्रणाली माने, तन्वी चांदोस्कर, रुचाली पाटकर, मिलिंद माने, वैभव करंगुटकर, मृणाली भडसळे, राजेंद्र शेटटे, महेश भडसाळे, पिंटु कोयंडे, युधी राणे आदी उपस्थित होते. हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी दयानंद पाटील यांनी मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + seven =