You are currently viewing आमचाही एक जमाना होता..3

आमचाही एक जमाना होता..3

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*आमचाही एक जमाना होता..3*

आम्ही कसे का असेना
आमचाही एक जमाना होता
चांगले असू वा वाईट
बघायला आम्हांला जथ्था जमत होता

वास्तवाच्या दुनियेत जगलो
रणांगणात वाढत गेलो
सत्य उशीराच कळू लागलं
स्वतःची टॅग लाईन करून जिंकलो

कपड्यावर सुरकुत्या !नात्यात औपचारिकता…..
कधीच जमली नाही..
छाती काढून चालत राहिलो
मान कधीच झुकली नाही..

नशिबाला दोष न देता
नव्याने स्वप्न आजही पाहतो
स्वप्नचं जगायला मदत करतात
कुस बदलून गाढ झोपून बघतो.

सुर्योदय आमच्याकरता एक औचित्य
जुने झाल्याची अभद्र जाणिव देतो
काळाची गोगलगाय पाठीवर बसवून
जुनं होत !नव्याला जुळवून घेतो

दिसण्याला तसा काही अर्थ नाही
मात्र सुंदर व्यक्तीमत्व जपतो
आमचाही एक जमाना होता
अभिमानाने ओरडून जगाला सांगतो

बाबा ठाकूर

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 5 =