*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा अध्यक्ष श्री.महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी श्री.वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*अमृतधारा*
************
तूच गे सुंदरा लडिवाळ लाघवी
गंगाच जणु मनःशांती सुखाची….
नितळ ,निर्मळ , निष्पाप परी तूं
साथ जीवनी अखंडित तृप्तीची….
कुठले स्वर्गसुख , कुठली शांती
तुजवीण दुजी न आंस मुक्तीची….
शब्दात सांगना कसे वर्णू तुजला
श्वासात साक्ष तुझ्या भावप्रितीची….
ऋतूऋतुतुन भारले प्रतिबिंब तुझे
तव रुपात अमृतधारा भावप्रितीची….
***************************
*रचना क्र. ५१ / १८ / ६ / २०२३*
*©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*
*📞 (9766544908)*