You are currently viewing पावसाळ्यापूर्वी बांदा येथे आपत्कालीन यंत्रणा सतर्क करा…

पावसाळ्यापूर्वी बांदा येथे आपत्कालीन यंत्रणा सतर्क करा…

मावाधिकार वेल्फेअर असोनसिएशन; सावंतवाडी तहसीलदारांकडे केली मागणी…

बांदा

शहरात दरवर्षी पावसाळ्यात तेरेखोल नदीला पुर येवून बाजारपेठ पाण्याखाली जाऊन व्यापाऱ्यांचे व नागरीकांचे नुकसान होते. अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाची आपत्कालीन यंत्रणा २४ तास कार्यरत ठेवावी असे निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेलफेअर असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांना देण्यात आले.
बांदा शहरात बांदा ग्रामपंचायतच्या वतीने आपत्कालीन समीती प्रशासनाने स्थापन करावी अशीही मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश केसरकर, महिला जिल्हाध्यक्षा दर्शना केसरकर, उपाध्यक्ष मिलींद धुरी, सचिव विष्णु चव्हाण, संचालक आनंद कांडरकर आदी उपस्थित होते. बांदा शहरात पुर आल्यावर वेगवेगळ्या मंडळाचे तरूण कार्यकर्ते आपत्ती व्यवस्थापनाचे व मदतीचे कार्य करत असतात. या मंडळाकडे असलेले साहीत्य तोकडे आहे. त्यासाठी शासनाने साहीत्य उपलब्ध करून द्यावे. येथील मदतकार्य करणाऱ्या तरुणांना प्रशिक्षित करावे. बांदा पोलीस स्टेशन मध्ये असलेली बोट व इतर साहीत्य यासाठी प्रशिक्षित कर्मचारी नेमुन महसुल यंत्रणेमार्फत याची चाचणी घ्यावी व आपत्ती व्यवस्थापन समीतीही स्थापन करावी अशी मागणी करण्यात आली.
तहसीलदार पाटील यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले

प्रतिक्रिया व्यक्त करा