*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा. सदस्या लेखिका आशा दोंदे लिखित अप्रतिम लेख*
गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने लावला हे आपल्याला ज्ञात आहेच, परंतु त्याच्या कितीतरी वर्षे आधी गुरुत्वाकर्षणाचा बरेच पुढे जाऊन आर्यभट्ट ने पृथ्वीचे सूर्या पर्यंतचे अंतर मोजलेले आपल्याला कधीच का शिकवले गेले नाही? विमानाचा शोध बंधूनी लावला असे आपल्याला शिकवले गेले पण त्याच्या कितीतरी आधी पुष्पक विमानाबद्दल हिंदूंच्या पौराणिक महाकाव्यात रामायणात उल्लेख आहे रामाचे विमान नंदिग्राम येथे उतरवल्याचा पुरावा सापडतो तसेच रावणाकडे दिव्य विमाने होती आणि तो ती विमाने हव्या त्या गतीने चालवू शकत असे पूर्वी साधुसंत पार हिमालयात म्हणजे शांत ठिकाणी जाऊन योग्याभ्यास करत आणि सिद्धी प्राप्त करून घेत असत आजत्या योगाचाच प्रचार सर्व देशात होत आहे आणि ते त्याच्या प्रचार करत आहेत योग भारतातील महत्त्वाच्या दुवा मानले जाते आपल्याला आपल्या महाभारत रामायण सारख्या अनेक ग्रंथांचा अभ्यास करायला हवा. आत्मिक सुख हवे क्षणिक सुख नको त्यात समाधान नाही अतृप्त राही मन सदा, नाही शांतीला स्थान शेतात सतत भोवती सुखाच्या मागे लागलो तर संकटांना आमंत्रण दिले जाते व समाधान कधीच मिळत नाही उलट हव्यास वाढत जातो हे आपल्या ग्रंथात आधीच सांगितले आहे त्याकडे आपण अलीकडे दुर्लक्ष करतो काम क्रोध मत्सराचे निरंतर दुःख देणारे चाळे, सहा रिपुंचे(षड् रिपू) अनैतिक जाळे जन्ममृत्यूत अडकवतात. जीवाच्या नित्य येरझाऱ्या चौऱ्याऐंशी योनीत प्रवेश करतात हे पूर्वीच आपल्याला सांगितले आहे पण ते सोडून आपण इतर परप्रांतीयांच्या धर्मात सांगितलेले खरे मानतो हीच खरी व्यथा आहे. आपल्याकडे आपल्या धार्मिक प्रथा वझ परंपरांमुळे समाज मागे जातो आहे असे म्हणतात. श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्या बागुलबुवा आपण करतो असे म्हटले जाते पण आपण पूर्वी इंग्रजी सिनेमा ड्रॅक्युला पाहिला होता ती अंधश्रद्धाच होती नाही का?
पण लक्षात कोण घेतो?
आज आयुर्वेद हा सर्व जगाला भारतीयांनी दिलेली वरदान आहे आरोग्यशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत आजीबाईंच्या बटवा आठवा किती औषधोपचार घरच्या घरी केले जायचे. अगदी साधे साधे उपाय, घरच्या घरी मिळणाऱ्या वस्तूंचा वापर केला जायचा
लागलं इजा झाली तर हळद लावा दुखतय सूज आले तेलाचा मालिश करा लेप लावा उन्हात जाताना कांदा विड्याचे पान डोक्यावर बांधा, चालून पाय दुखतात मीठ टाकलेल्या पाण्यात पाय टाकून बसा ताप आला डोक्याला थंड पाण्याच्या पट्ट्या बांधा , गळू झाल्यावर पोटीस बांधणे, किती सोपे सोपे उपाय होते हे.
खगोलशास्त्र बद्दल तर काय बोलावे ग्रह तारे यांचा कितीतरी अभ्यास आपण आधीच केला होता ग्रहण नाव देणे हे आपल्याला माहिती होते ध्रुवतारा जो स्थिर असतो त्याला आपण नाव दिले म्हणजे तो आपल्याला माहिती होता सात तारीख एकत्र असतात हा शोधच नाही का त्यालाच सप्तर्षी म्हटले गेले पृथ्वीचे आणि चंद्र सूर्याचेअंतर किती आहे याची माहिती फार पूर्वीपासून आपल्याला होते आणि यासाठीच आपले संख्याशास्त्र उदयास आले आपली संख्याशास्त्र किती बरोबर आहे अगदी शून्य माहिती होते आणि तेथ पासून संख्या हजार, दहा हजार, लक्ष, दशलक्ष ,कोटी, दशकोटी अब्ज ,दशअब्ज, खर्व बापरे , किती हा आपल्या पूर्वजांचा अभ्यास.
याचाच वापर करून ज्योतिष शास्त्र उदयाला आले. त्यासाठीही इतका अभ्यास केला की पूर्वी राजांना त्यांचं भविष्य तंतोतंत सांगितले जायचे. राजांकडे ज्योतिषी होता तसेच वैद्य होता तो चाटण द्यायचा. सौंदर्य प्रसाधन किती सोपी सोपी होती. केसांना तेल लावणे नारळाच्या दूधाने डोक्यावरून आंघोळ करणे यामुळे केसांची चांगली वाढ होत असेल तसेच चेहऱ्याला हळद दही लावणे चेहऱ्याला मध लावणे यामुळे चेहरा सतेज दिसायचा अलीकडे स्क्रब हा प्रकार आला आहे परंतु पूर्वी आपण दिवाळीमध्ये चेहऱ्याला खसखस हळद आणि गौला कचरी लावत होतो. या सर्व गोष्टी आज आपण विसरत चाललो आहोत आणि परप्रांतीयांचे अनुकरण करून आणि कंपन्यांच्या जाहिरातींना फसून आपण आपलेच नुकसान करीत आहोत.
दासबोध, गीता, भागवत, गीता ,गीताई ,ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत, मनाचे श्लोक असे आपले कितीतरी ग्रंथ आहेत. त्याचा अभ्यास व्हायला हवा . त्यात वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास पाहायला मिळतो.
इव्ह आणि आदाम हे मूळ पुरुष असे आपल्याला सांगण्यात आले परंतु आपल्याकडेही आदीपुरुष का संकल्पना होतीच. आपला मूळ पुरुष मनु सांगतात. मनुष्य जातीच्या पहिला पूर्वज किंवा पहिला पुरुष ऋग्वेदात व अन्य वेदात म्हटले आहे म्हणूनच आपण मानव, मनुष्य, मनुज असे मनुष्यवाचक शब्द वापरतो. संस्कृत व अन्य भारतीय भाषांत ते रूढ आहेत. मनुस्मृती हा प्राचीन भारतीय हिंदू धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे खरं तर याच्यावरूनच इंग्रजांनी हिंदू कायदा तयार केला.
वास्तुशास्त्र पण आपले खूप प्रगल्भ आहे. आपल्याकडे येणारे वारे व त्यावरून घर बांधले जात असे. वास्तुशास्त्राप्रमाणे दार कुठे असावे खिडक्या कुठे असाव्यात देवांचे फोटो कुठे असावेत शेगडी कुठे असावी या गोष्टी सांगितल्या आहेत याचा शास्त्र सुद्धा अभ्यास केलेला दिसतो साधी दिशा सांगताना त्यांना प्रमुख चार दिशा चार उपदिशा आणि दोन उर्ध्व आणि अधर दिशा या सर्व मिळून एकूण दहा दिशांचा अभ्यास झालेला आहे होकायंत्राची गरज नंतर आली पण त्याआधी सूर्याचे उगवणे आणि सूर्याचे मावळणे त्यावरून देशात ठरवल्या जात. कोणत्या धर्मात अशा दहा दिशा आहेत व त्यांना वेगवेगळी नावे आहेत.
आज पाहिले तर परदेशी लोक आपल्या ग्रंथांचा अभ्यास करत आहेत आणि आपण त्यांचे विचार घेत आहोत आज पौराणिक सिनेमांना पुन्हा उर्जितावस्था आलेली आहे. ते प्रसिद्ध होत आहेत आणि लोकांना आवडत आहेत. परदेशातही त्या लोकांना ते आवडतात आणि परदेशामध्ये आपल्या गाण्यांवर नाद केला जातो हे आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. आपली खाद्य संस्कृती ही खूप प्रसिद्ध आहे इतरांना ती आवडू लागले आहे, आपण किती मसाल्यांचा वापर करतो आणि चवीमध्ये वैविध्य आणतो. आपली गाणी जास्त शास्त्रोक्त असल्याकारणाने त्या ठेक्यावर आपण नाच करतोच पण परदेशी यांनाही त्यावर नाच करावासा वाटतो हे महत्त्वाचे. आपण सणवार पाळतो . इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले प्रत्येक सण हे पर्यावरण पूरक आहेत. निसर्गाशी जुळवून घेतो आपण .वटपौर्णिमा यामुळे बडा जवळ जाणे , व शुद्ध हवा घेणे सहाजीकच आले.
नागपंचमीला नागाची पूजा करतो इथे प्राणिमात्रांवर प्रेम करावे हे येते तसेच पोळा या सणाला बैलांना सजवून आपण त्या दिवशी त्याची पूजा करतो याचे कारण म्हणजे वर्षभर त्या प्राण्यांनी आपली सेवा केली होती तर त्यांचे उपकार मानायलाच हवेत असे शेतकऱ्याला वाटते त्यात काय चूक आहे पण ही गोष्ट आपल्याला सहज शिकवली गेली. अलीकडे पर्यावरणाबद्दल बरेच बोलले जाते प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका असे सांगितले जाते पण पूर्वी आपण कापराच्या पिशव्या वापरत होतो हे प्लॅस्टिक कुठून आले कोण जाणे. मकर संक्रांतीला गोड बोलायला शिकवले तर भाऊबीज पाडवा याने नातेसंबंध दृढ केले. अशा विविध सणांचा आदर आपण करायला हवा आपण वाढदिवस हा दिव्याने ओवाळून करतो दिवा भिजवून नाही. शनिवारी नटून थटून बायका एकमेकींना भेटतात व त्यांचे कौतुक करतात, त्यांना नटण्यासाठी निमित्त हवे असते. आपल्याकडे दागिन्यांची कमी नाहीच. त्यांची नावे तरी किती त-हा तरी किती. गळ्यात घालण्यासाठी खुशी, तन्मणी, बोरमाळ ,चपला हार ,बकुळा हार, तर हातात घालण्यासाठी बांगड्या बाटल्या तोडे किती सांगावेत.
कपड्यांच्या बाबतीत साड्यांचे कितीतरी प्रकार आहेत पैठणी घेतली तर त्याला पूर्वी सोन्याची जर असायची, नारायण पेठ, कोल्हापुरी, बनारसी, कांजीवरम ,जामदानी, बांधणी, सिल्क साडी, फुलकारी कलमकारी टसर, पोचमपल्ली ,कांदा, किती हे प्रकार अशा साड्या नेसून आणि दागिने घालून भारतीय स्त्री दिसली की तिच्याबद्दल आदरभाव वाटणारच.
भारतात पूर्वी ढाक्याचे मनमत प्रसिद्ध होती असे म्हणतात की ती अंगठी मधून पूर्ण साडी जात असेल इतकी कलम होती.
आपल्या भाषेत बद्दल तर काय बोलावे? माझा मराठीची बोलू कौतुके| परी अमृता तेही पैजा जिंके| ऐसी अक्षरे रसिके मेळविन|मराठी भाषेला तर सरस्वतीचा वरदहस्त आहे. अतिशय समृद्ध आफाट शब्दसंपदा असून ती प्रत्येक प्रांतात वेगळी आहे किती संत महात्मे होऊन गेले स्मरण त्यांचे करा जरा. संस्कृत भाषा प्राकृत भाषा त्यापासून आलेली मराठी भाषा प्रत्येक प्रदेशातली वेगळी भाषा खानदेशी वैदर्भी कोल्हापुरी कोकणी किती हा वेगळेपणा. आपण असा अभ्यास केला की मंत्र तंत्र यांचा अभ्यास करताना इतकी शक्ती होती की दिलेला आशीर्वाद फलद्रूप तर दिलेला शाप खरा व्हायचा पण एवढी शक्ती त्या काळात साधुसंतांनी प्राप्त केली होती. आकाशवाणी हा तर वेगळाच प्रकार असणार.
भारतात नुसती मराठीच नाही तर अनेक भाषा आहेत गुजराती ,हिंदी ,बंगाली ,
कन्नड, कितीतरी भाषा आहेत. त्या प्रत्येक भाषेच वैशिष्ट्य आहे. मराठीमध्ये एका शब्दाला किती तरी अर्थ असतात किंवा एक शब्द किती वेगवेगळ्या पद्धतीने वापरला जातो याचे उदाहरण द्यायचे तर डोळा हा शब्द घ्या तर त्याचे डोळे वटारणे, डोळ्यात अंजन घालणे, डोळे मोडणे, डोळा लागणे ,डोळा मारणे ,डोळा चुकवणे डोळे बंद होणे, डोळे उघडणे ,डोळे फिरवणे, डोळे दिपणे ,डोळे पांढरे होणे, डोळे भरून येणे डोळे लावून बसणे डोळे झाक करणे डोळ्यात रान आणणे डोळ्यात धूळ फेकणे, डोळ्यात तेल घेऊन पाहणे, डोळ्यात सलणे, डोळ्यावर कातडे ओढणे, डोळ्याला डोळ्यांना लागणे, यातून आठवलं आपल्याकडे म्हणे तर किती आहेत आणि त्या प्रचलित आहेत आपल्याकडे लेखकांचीही कमी नाही, कालिदासाचे शाकुंतल तसेच अनेक लेखक कवींचे उत्कृष्ट लेखन पण आपण त्याचा गाजावाजा कधीच केला नाही जाहिरात करत नाही तिथेच आपण कमी पडतो असं मला वाटतं त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
या लेखाला वाचकांनी चांगला प्रतिसाद द्यावा व आपले विचार सुद्धा सांगावेत आणि यात भर टाकावी असे मला वाटते.
आशा दोंदे,ठाणे.
*संवाद मिडिया*
⭕ _*प्रवेश सुरु ! प्रवेश सुरु !! प्रवेश सुरु !!!*_ ⭕
डिस्टिंक्टिव्ह एज्युकेशन सोसायटीचे ….
*श्री रामराजे कॉलेज ऑफ आय.टी, मीडिया अँन्ड हॉटेल मॅनेजमेंट, दापोली.*
(संलग्न मुंबई विद्यापीठ, मुंबई व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त)
*शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू….*
https://sanwadmedia.com/99114/
*👉हॉटेल मॅनेजमेंट (Hospitality Studies)*
प्रवेश पात्रता – 12 वी उत्तीर्ण ( कोणतीही शाखा )
कालावधी – 3 वर्षे
आजच आपला प्रवेश निश्चित करा.
📚 वैशिष्टये 📚
▪︎ १०० % प्लेसमेंट.
▪︎५ स्टार हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण.
▪︎ संस्थेतील अनेक विदयार्थी परदेशी कार्यरत.
*👉अनुसूचित जाती / जमाती (SC /ST ) च्या विद्यार्थांना १००% मोफत प्रवेश.(शासन नियमानुसार).*
*पत्ता – ता.दापोली , जि. रत्नागिरी*
📱संपर्क क्रमांक :
*9420156771 / 7057421082 / 9028466701 / 9527873432*
*कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.*
*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/99114/
———————————————-