You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या १४ मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या आज होणार जाहीर– भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या १४ मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या आज होणार जाहीर– भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

*सिंधुदुर्ग जिल्हा भाजपच्या १४ मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या आज होणार जाहीर– भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत*

सिंधुदुर्ग

महाराष्ट्रात सध्या भारतीय जनता पक्षाचे संघटन पर्व सुरू आहे. या पक्षाने राज्यात दीड कोटीच्या वर सदस्य नोंदणी केली आहे. आता राज्यातील ११४६ मंडल अध्यक्षांच्या निवडी राज्यात एकाच वेळी आज रविवारी दिनांक २० एप्रिल रोजी जाहीर होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही १४ मंडळ अध्यक्षांची निवड यादी प्रदेशाकडून आज जाहीर होईल शुक्रवारी मुंबईत झालेल्या भाजप कोआर कमिटीच्या बैठकीत याबाबतची चर्चा विनिमय करण्यात आली. श

दरम्यान शुक्रवारी सिंदूर जिल्हा कोर कमिटीची बैठक भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मुंबईत संपन्न झाली. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतुल काळसेकर, प्रमोद जठार, अॅड अजित गोगटे भाजप जिल्हा सर्व जिल्हा सरचिटणीस, महिला अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष आधी उपस्थित होते. मंडळ अध्यक्ष निवडीबाबत या बैठकीत चर्चा झाली. मा खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या निवड प्रक्रियेला अंतिम स्वरूप देण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्यातील मंडल अध्यक्षांच्या या निवडी पारदर्शक व पक्षाचे निरीक्षक नेमणूक झाले आहेत. पक्षाच्या निरीक्षकांनी त्या त्या मंडळात जाऊन कार्यकर्त्यांची मते आजमावून घे त्या भागातील कल लक्षात घेऊन निरीक्षकांनी मंडल अध्यक्षांच्या निवडी बाबत प्रदेशाला अहवाल सादर केलाआहेत. वा या निवडीचा हा बंद लखोटा कोअर कमिटीच्या हाती सोपविला आहे. राज्यात ११४६ मंडल अध्यक्षांच्या नियुक्ती उद्या एकाच वेळी जाहीर होत आहे. सिंधुर्गातील १४ मंडल अध्यक्षांच्या नियुक्ती आज जाहीर होतील असेही यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा