You are currently viewing आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे ऑटोरिक्षा चालक-मालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपतर्फे ऑटोरिक्षा चालक-मालकांसाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन

कणकवली

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली शहर भाजपतर्फे शुक्रवार २३ जून रोजी सकाळी १० वा. लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात ऑटोरिक्षा चालक-मालकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे.
शिबिरात शल्यचिकीत्सक डॉ. श्रीपाद पाटील, चेस्ट स्पेशालिस्ट डॉ. बी. जी. शेळके, जनरल सर्जन डॉ. विद्याधर तायशेटे, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. धनंजय रासम,
नेत्र चिकित्सक डॉ. प्रियांका चिवटे उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहे. शिबिरादरम्यान मोफत चष्माचे वाटप केले जाणार आहे. याचा लाभ ऑटोरिक्षा चालक–मालकांनी घ्यावा, असे आवाहन शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी केले असून अधिक माहितीसाठी (९८५०७४१४४१) या क्रमांकावर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा