You are currently viewing जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनचे ३१ जानेवारीला आझाद मैदान येथे धरणे

जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनचे ३१ जानेवारीला आझाद मैदान येथे धरणे

*जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनचे ३१ जानेवारीला आझाद मैदान येथे धरणे*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

जनरल इन्शुरन्स पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने निवृत्ती वेतनाच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ३१ जानेवारीला आझाद मैदान येथे दिवसभर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.


संघटनेचे चेअरमन काका सामंत, जनरल सेक्रेटरी उदयन बॅनर्जी आणि सतीश शेंडे यांनी संयुक्तिक प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, सध्या मिळणारी फॅमिली पेन्शन १५ टक्के असून ती अत्यंत तुटपुंजी आहे. तरी केंद्र सरकारच्या धर्तीवर ती ३० टक्के इतकी असावी. जानेवारी २०२० मध्ये मुंबई आणि फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीच्या जंतर मंतर येथे केलेल्या आंदोलनानंतर अर्थ मंत्रालयाने ती ३० टक्के इतकी करण्यास तत्वतः मान्यता दिली होती. त्यानंतर बँकेच्या पेन्शनधारकांची मागणी मान्य झाली परंतु इन्शुरन्स पेन्शनधारकांचा प्रश्न प्रलंबितच आहे. ही मागणी तर मान्य व्हावी तसेच इन्शुरन्स पॉलिसीच्या टर्म्समध्येदेखील सुधारणा व्हावी, हेही या धरणे आंदोलनाचे प्रयोजन आहे. या धरणे आंदोलनात अधिकाधिक पेन्शनधारकांनी सहभागी व्हावे आणि शासनाला दखल घेणे भाग पाडावे, असे आवाहनदेखील निवेदनात केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा