You are currently viewing रिलायन्स फाऊंडेशन व कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी यांच्या संयुक्तं विद्यमाने भात शेतकऱ्यांना कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन

रिलायन्स फाऊंडेशन व कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी यांच्या संयुक्तं विद्यमाने भात शेतकऱ्यांना कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन

रत्नागिरी :

 

रिलायन्स फाऊंडेशन व कृषी संशोधन केंद्र, शिरगाव रत्नागिरी यांच्या संयुक्तं विद्यमाने आज “भात लागवडीपूर्वीचे नियोजन व व्यवस्थापन” या विषयी मोबाईल कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला होता. सदर कार्यक्रमास मा. डॉ. विजय दळवी सर, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख, कृषी संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी यांनी बियाणे निवड, बीज प्रक्रिया, भात लागवडीची श्री पद्धत, सगुणा पद्धत, खत व्यवस्थान, तण व्यवस्थापन, उगवण क्षमता, बीजोत्पादन इत्यादि महत्वाच्या विषयी सखोल मार्गदर्शन केलं. रिलायन्स फाऊंडेशन मार्फत रत्नागिरी तालुक्यातील १५० भात शेतकऱ्यांची निवड करुन त्यांना प्रगत भात लागवडी संदर्भात पेरणी पूर्व ते काढणीपर्यंत सर्व तांत्रिक माहिती व्हॉट्सॲप व ध्वनी संदेशा मार्फत. देण्यात येतं आहे. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांच्या गरजे वर आधारित भात लागवडी संदर्भात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या उपक्रमाचा मुख्य उद्देश तांत्रिक माहितीद्वारे शेतकऱ्यांचा इनपुट खर्च कमी करणे, उत्पन्न वाढविणे व नुकसान कमी करणे. सदर कार्यक्रमास रिलायन्स फाउंडेशनचे जिल्हा व्यवस्थापक श्री राजेश कांबळे, कार्यक्रम सहाय्यक प्रणाली गोरे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा