You are currently viewing खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन

खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन

*खामगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन*

शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव चे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन 27 ऑगस्ट 2023 रोजी ए.के. नॅशनल हायस्कूल, खामगाव येथे आयोजित करणार असल्याचे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी कळविले आहे यासंदर्भात नुकतीच ए.के. नॅशनल हायस्कूल येथे या संमेलनाच्या संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. प्रविणा शाह होत्या तर देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा आवृत्तीची संपादक श्री राजेश राजोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य प्रसिद्धीप्रमुख ह. भ. प. शंकर महाराज राजपूत फाउंडेशनचे आजीव सभासद कवी प्रा. देवबा शिवाजी पाटील बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ.पंढरीनाथ शेळके जिल्हा समन्वयक श्री पांडुरंग दैवज्ञ जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार जिल्हा समन्वयक शितलताई शेगोकार जिल्हा संघटक डॉ. निवृत्तीभाऊ जाधव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख श्री विजय बुडूखले जळगाव जिल्हा शाखेचे सल्लागार श्री मधुकर पोतदार श्री गोपाळ उज्जैनकर, गजानन मांडवेकर ,पूजा खेते मॅडम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अँड सर्जेराव साळवे आदी उज्जैनकर फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित होते याप्रसंगी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला ए.के. नॅशनल विद्यालयाच्या प्राचार्या तथा या सभेच्या अध्यक्षा डॉ. प्राचार्य डॉ. प्रवीना शाह यांनी पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांनी पूजन केले. प्रसंगी प्रथम संमेलनाच्या नियोजना विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
प्रसंगी देशोन्नतीचे बुलढाणा जिल्हा आवृत्तीचे संपादक श्री राजेश राजोरे यांनी उज्जैनकर फाउंडेशनचे दुसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन आपल्या ए.के. नॅशनल हायस्कूल खामगाव या ठिकाणी आयोजित केल्याबद्दल त्यासाठी सर्वतोपरि सहकार्य करण्याचे व संमेलन यशस्वी करण्याचे आश्वासन दिले. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. प्रवीना शाह म्हणाल्या की आमच्या विद्यालयामध्ये हे संमेलन पहिलेच असून माझी सुद्धा इच्छा बाल,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी घेण्याची अशी मनापासून इच्छा होती ती इच्छा आज पूर्ण होत आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले याप्रसंगी प्रास्ताविक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी केले याप्रसंगी त्यांनी विविध ठिकाणी आयोजित संमेलनाविषयी माहिती दिली याप्रसंगी सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या सभेचे सूत्रसंचालन फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा शाखा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार यांनी केले तर शेवटी आभार फाउंडेशनचे बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख प्राचार्य डॉ. पंढरीनाथ शेळके यांनी केले.

 

*संवाद मिडिया*

*🧑🏻‍🎓प्रवेश..सुरू ! प्रवेश..सुरू ..!! प्रवेश..सुरू ..!!!🧑🏻‍🎓*

📣 *B. C. A. DEGREE*

*BCA Degree ला ॲडमिशन म्हणजे संगणक क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी.*🧑‍💻🧑‍💻

*👉 प्रवेश पात्रता…*
*▪️प्रथम वर्ष बीसीएकरिता: कोणत्याही शाखेची बारावी परीक्षा (गणित किंवा गणिताशिवाय) किमान ४५ टक्के व मागासवर्गीयांसाठी ४० टक्के गुणांसह उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका उत्तीर्ण*
*▪️थेट द्वितीय वर्ष बीसीएकरिता: डिप्लोमा पदवीका प्रथम श्रेणीत उत्तीर्ण (सिव्हिल इंजिनियर व्यतिरिक्त)*
*▪️मर्यादित प्रवेश उपलब्ध*

*संपर्क:*
*महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, कॉलेज ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फॉर वुमन्स*
*(एसएनडीटी महिला विद्यालय, मुंबई संलग्न)*
*साखरतर रोड, शिरगाव, रत्नागिरी*

*📱 ७९७२९९७५६७, ९४२०२७४११९*

*Advt Link*
https://sanwadmedia.com/98807/
———————————————-

प्रतिक्रिया व्यक्त करा