वैद्यकीय आणि औषध निर्माण शास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा द्यावी लागते.मात्र या नीट परीक्षेचे केंद्र सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नसल्याने विद्यार्थ्यांना गोवा येथे ही परीक्षा देण्यासाठी जावे लागत होते. याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे सिंधुदुर्ग व रत्नागिरी मध्ये नीट परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात ना. उदय सामंत व उच्च व तंत्रशिक्षण विभागाने केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.त्यानुसार नीट परीक्षेची देशात नवीन 55 केंद्रे मंजूर करण्यात आली त्यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये दोन नीट परीक्षा केंद्र मंजूर करण्यात आली आहेत.अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांतुन दोन नीट परीक्षा केंद्र मंजूर
- Post published:जुलै 13, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
झाराप पर्यटक मारहाण प्रकरणात पोलिसांनीच दाखल केली तक्रार – अपर पोलीस अधीक्षक कृषीकेश रावले
जिल्हास्तरीय शालेय मुष्टीयुद्ध ( बॉक्सिंग )स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल चे घवघवीत यश
वैभव नाईकच पुढचे पालकमंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त करत तेर्सेबांबर्डे येथील मनसेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
