नानेली गावच्या सीमेवर असणाऱ्या कालिका देवी पुलच्या मोरीमध्ये अडकलेल्या लाकडाच्या ओंडक्यानी पाणी तुंबून राहत असल्याचे लक्षात येताच गावचे सरपंच व त्यांचे सहकारी यांनी मागचा पुढचा कोणताही विचार नं करता स्वतः पाण्यात उतरून मोरीत अडकलेल्या लाकडांना बाहेर काढून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे महत्वाचं काम केल. मोठा पाऊस आल्यानतर याच अडकून बसलेल्या लाकडानी पाणी तुंबून राहून पुलावर पाणी येण्याचे प्रकार निदर्शनास येताच योग्य पाऊल उचलण्याचे कार्य स्वतः सरपंच श्री. प्रज्ञेश धुरी यांनी केले. त्यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश धुरी,हर्षद धुरी, बाबल्या परब, सुमन सावंत, रुपेश नार्वेकर,व इतर मित्र सुद्धा या सत्कार्यास सहभागी होते. या सर्वांचे गावामध्ये कौतुक केले जात आहे.
नानेली कालिका देवी पूलच्या तुंबलेल्या मोरी केल्या साफ
- Post published:जून 21, 2021
- Post category:कुडाळ / बातम्या
- Post comments:0 Comments
You Might Also Like
बिबवणे येथे महामार्गावर शेळ्यांच्या कळपाला बोलेरो कारची धडक; सोळा शेळ्या जागीच ठार
सिताराम कुडतरकर यांना कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
पत्रकार कल्याण निधी वाढीसाठी व्हॉईस ऑफ मीडियाचा तीन वर्षांचा संघर्ष यशस्वी
