You are currently viewing बिबवणे येथे महामार्गावर शेळ्यांच्या कळपाला बोलेरो कारची धडक; सोळा शेळ्या जागीच ठार

बिबवणे येथे महामार्गावर शेळ्यांच्या कळपाला बोलेरो कारची धडक; सोळा शेळ्या जागीच ठार

कुडाळ
बिबवणे येथील महामार्गाच्या कडेने चालत जाणार्या शेळ्यांच्या कळपाला समोरून येणार्या बोलोरो कारची धडक बसुन झालेल्या अपघातात सोळा शेळ्या जागीच ठार झाल्या तर अनेक शेळ्या गंभीर जखमी झाल्याची घटना बिबवणे येथे घडली. हा अपघात शुक्रवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली.

कुडाळ तालुक्यातील बिबवणे येथील महामार्गावरून एक मेंढपाळ कुटुंबिय कुडाळच्या दिशेने शेळ्याचां कळप घेवुन चालत जात होते. दरम्यान चालत जाणार्या शेळ्यांचा कळपाला समोरून येणार्या बोलोरोने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सोळा शेळ्या जागीच ठार झाल्या तर अनेक गंभीर जखमी झाल्या असल्याने मेंढपाळ यांचे सुमारे दिड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल नव्हती.

प्रतिक्रिया व्यक्त करा