You are currently viewing भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात…

ऑरेंज हाऊसकडे सर्वसाधारण विजेतेपद; लाठी-काठी, मल्लखांब आणि कवायती ठरल्या आकर्षण….

सावंतवाडी

यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचा वार्षिक क्रीडा महोत्सव ‘डिफरंट बिट्स, वन स्पोर्टींग स्पिरिट’ या संकल्पनेखाली आज दिमाखात संपन्न झाला. विविध क्रीडा स्पर्धा, आकर्षक संचलन आणि प्रात्यक्षिकांमुळे महोत्सवात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी सचिव संजीव देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी ले. कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सैनिक स्कूल प्राचार्य सॅव्हिओ फर्नांडिस, मुख्याध्यापिका प्रियंका देसाई आणि उपमुख्याध्यापिका अवंतिका नाईक उपस्थित होत्या.

स्वागतगीत आणि मशाल संचलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध संचलन आणि कवायतींनी उपस्थितांची मने जिंकली. पूर्वप्राथमिक ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मनोरंजक खेळ आणि मैदानी स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. यामध्ये लाठी-काठी आणि मल्लखांबाची प्रात्यक्षिके विशेष आकर्षण ठरली. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मार्च पास्ट, हाऊस ड्रिल तसेच ‘बेस्ट ऍथलेटिक बॉय’ आणि ‘बेस्ट ऍथलेटिक गर्ल’ हे विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. रस्सीखेच स्पर्धेतील सहावी व आठवीच्या संघातील अंतिम सामना रंगतदार ठरला.

सर्वसाधारण हाऊस चॅम्पियनशिपमध्ये ऑरेंज हाऊस (अग्नी हाऊस) यांनी विजेतेपद, तर यलो हाऊस (वायू हाऊस) यांनी उपविजेतेपद पटकावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रेसीडा डिसोझा, ज्योती लोखंडे व प्रशांती चव्हाण यांनी केले. प्राची कुडतरकर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना रुजवणारा हा क्रीडा महोत्सव विद्यार्थ्यांना नवीन सत्रासाठी ऊर्जा देणारा ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा