You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव असलेल्या समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या कामासाठी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून १५ लाख रु. निधी मंजूर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव असलेल्या समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या कामासाठी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून १५ लाख रु. निधी मंजूर

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकमेव असलेल्या समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या कामासाठी आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून १५ लाख रु. निधी मंजूर*

*खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते झाले कामाचे भूमिपूजन*

मालवण तालुक्यातील वायरी जाधववाडी येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असलेल्या समर्थ रामदास स्वामींच्या मठाच्या कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी १५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे भूमिपूजन शुक्रवारी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.यावेळी जाधववाडीतील जेष्ठ ग्रामस्थ महिलांचा खा.राऊत, आ.नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी खा. विनायक राऊत म्हणाले वायरी जाधववाडी येथे रामदास स्वामींचा पुरातन मठ आहे. रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून ओळखले जातात. याच छत्रपतींनी बांधलेल्या किल्ले सिंधुदुर्ग समोर हा मठ आहे. या मठाच्या बांधकामासाठी आमदार वैभव नाईक यांनी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. मठाचे काम कारण्याबरोबच येथे येणाऱ्या पर्यटकांना या मठाची माहिती, दर्शन घेता यावे यादृष्टीने या मठाला पर्यटनाच्या माध्यमातून वेगळा दर्जा कसा मिळेल यासाठी येत्या काळात प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले.

आमदार वैभव नाईक म्हणाले, समर्थ रामदास स्वामींची सेवा करण्याची संधी या मंडळाने दिली हे माझे भाग्य आहे. किल्ले सिंधुदुर्गवरील मंदिराच्या नूतनीकरणाचे तसेच सिंहासनाचे उदघाटन नुकतेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या मठाच्या कामाचे आज भूमिपूजन झाल्यानंतर हे कामही लवकरात लवकर कसे मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करायचे आहेत. या कामासह किनारपट्टी भागातील धूप प्रतिबंधक बंधार्‍यांची कामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रलंबित आहेत ही कामेही लवकरात लवकर मार्गी लागावीत यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मच्छीमार बांधवांचा आपल्याला नेहमीच पाठिंबा राहिला आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यास मी नेहमीच प्राधान्य दिले आहे त्यामुळे या पुढील काळातही मच्छीमारांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, सरपंच भगवान लुडबे, उपसरपंच नाना नाईक, दिलीप घारे, दीपा शिंदे, प्रियांका रेवंडकर, मनोज लुडबे, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, प्रदीप वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा