You are currently viewing विद्यार्थ्यांनी जमिनीवर साकारली ‘संविधान दिन’ ही अक्षरे : अनोख्या उपक्रमातून संविधानाला मानवंदना

विद्यार्थ्यांनी जमिनीवर साकारली ‘संविधान दिन’ ही अक्षरे : अनोख्या उपक्रमातून संविधानाला मानवंदना

कडेगाव / प्रदीप जोशी :

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या तात्या रावजी विद्यालय, तडसर (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे विद्यार्थ्यांनी अनोख्या उपक्रमातून भारतीय संविधानाला मानवंदना दिली.

विद्यालयातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत जमिनीवर बसून आपल्या शरीररचनेतून ‘संविधान दिन’ ही अक्षरे साकारली. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमातून एकता, संघभावना, शिस्त, कल्पकता आणि संविधानाप्रती आदरभाव यांचे सुंदर दर्शन घडले. प्रत्येक विद्यार्थ्याच्या सहभागातून साकारलेली ही अक्षररचना सामूहिक शक्ती आणि संविधानावरील निष्ठेचा संदेश देणारी ठरली.

मुख्याध्यापिका सौ. यू. ए. पाटील यांच्या सूचनेनुसार विद्यालयातील सर्व शिक्षकांनी या उपक्रमासाठी सहकार्य व योगदान दिले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत हा उपक्रम यशस्वी केला.

यावेळी भारतीय संविधानाने दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये आपल्या जीवनात अंगीकारण्याचा संदेश देण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधाननिर्मितीतील योगदानाचे स्मरण करून संविधानाचा सन्मान राखण्याचे आवाहन करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या या कल्पक आणि प्रेरणादायी उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा