You are currently viewing जग सुंदर

जग सुंदर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी गीतकार गायक संगीतकार श्री अरुणजी गांगल लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 *”जग सुंदर”* 

 

आपण जग सुंदर घडवू राष्ट्र महान

विश्वशांती नांदू दे सर्वत्र व्हावे सुखी जीवनIIधृII

 

दृढ विश्वासाने दिसती आशेचे किरण

सकारात्मक राहून घेऊया मेहनत

राष्ट्र बनवूया सशक्त सुसंस्कृत संपन्नII1II

 

सूर्याची किरण देती ऊर्जा तेजवान

स्वच्छ भारत अभियान करू जलसंवर्धन

जीवसृष्टी सांभाळू राखूया पर्यावरणII2II

 

विचारांत असतात पंचमहाभूत

सुंदर विचार बनवती सुंदर जीवन

फिटेल अंधाराचे जाळे पुढे दिसे उजेडII3II

 

वास्तव पारखून ठेवूया व्यवधान

प्रत्यक्षाहून प्रतिमा असते उत्कट

विचारांचे ठेवू संतुलन एकजूट साथII4II

 

जुन्या वाईट चाली रीती वगळूया

अन्याया विरुद्ध सत्यासाठी लढूया

विकसित भारत घडवूया भविष्य उज्वलII5II

 

भारतीय राज्यघटनेचे करूया रक्षण

लोकशाही टिकवुया रक्षुया भेदातीत

माणुसकी जपूया टिकवूया संविधानII6II

 

©️काव्य:श्री अरुण गांगल. कर्जत रायगड महाराष्ट्र.

पिन.410201.Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा