You are currently viewing || २६/११ – श्रद्धांजली ||
Oplus_16908288

|| २६/११ – श्रद्धांजली ||

*जागतिक साकव्य विकास मंचचे सन्मा सदस्य तथा साहित्यरत्न लेखणीसम्राट विचारमंच महाराष्ट्रचे प्रशासक लेखक कवी प्रभाकर भामरे लिखित भावस्पर्शी काव्यरचना*

 

*|| २६/११ – श्रद्धांजली ||*

 

काळरात्र ती आली, काळजावर घाव घाली,

मुंबई नगरी जळली, जणू अग्नीत होळी जळली

 

समुद्रातून आले, काळासारखे काळे,

पण शूर जवान, हिमालयापरी खडे

 

रक्त सांडले तरी, मागे न हटले,

नंदा दीप प्रमाणे, अंधारातही तेवत राहिले

 

आईच्या डोळ्यांतले, अश्रू सुकले नाही अजून,

वीरांच्या चरणांवरी, वंदन करतो फुले अर्पून

 

मातीत मिसळले देह, पण कीर्ती अमर राहिली,

मुंबईच्या हृदयात, शहिदांची ज्योत जागली

 

इंदुमाय म्हणे, श्रद्धांजली ही नाही शब्दांची,

ती आहे शपथेची, भारत जोडण्याच्या प्रतिज्ञेची

 

इंदुप्रभा

प्रभाकर भामरे

प्रतिक्रिया व्यक्त करा