You are currently viewing दीपावलीच्या उत्साहात सरमळे येथे रंगला ‘खेळ पैठणीचा’
Oplus_16908288

दीपावलीच्या उत्साहात सरमळे येथे रंगला ‘खेळ पैठणीचा’

संजू परब यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन; गावाच्या विकासासाठी खंबीर साथ देण्याची ग्वाही

सरमळे : दीपावलीच्या निमित्ताने सरमळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सरमळे नांगरतास ग्रामस्थांच्या वतीने सातेरी भगवती देवी मंदिर येथे ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, सरपंच विजय गावडे, उपसरपंच श्री. गावडे, पोलीस पाटील श्री. नाईक, शाखाप्रमुख संजय गावडे यांच्यासह अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी संजू परब यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सरमळे गावाच्या विकासासाठी आपण नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे आश्वासन दिले. गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध असून, गावाच्या विकासकामांना आपले नेहमीच सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख शावियर फर्नांडिस, युवासेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस, सरपंच विजय गावडे, उपसरपंच श्री. गावडे, पोलीस पाटील श्री. नाईक, शाखाप्रमुख संजय गावडे यांच्यासह अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा