You are currently viewing त्रिपुरी पौर्णिमेला कुर्ली देवीचा जत्रोत्सव; कोकणातील यात्रोत्सवांना प्रारंभ

त्रिपुरी पौर्णिमेला कुर्ली देवीचा जत्रोत्सव; कोकणातील यात्रोत्सवांना प्रारंभ

त्रिपुरी पौर्णिमेला कुर्ली देवीचा जत्रोत्सव; कोकणातील यात्रोत्सवांना प्रारंभ

धरणामुळे मूळ मंदिर पाण्याखाली, नव्या मंदिरात भरते श्रद्धेची जत्रा; मुंबईकर चाकरमान्यांचीही मोठी उपस्थिती

कुर्ली :

त्रिपुरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर कुर्ली गावातील श्री देवी कुर्ली मातेचा वार्षिक जत्रोत्सव आज भक्तिभावात साजरा होत आहे. घोणसारी येथील जत्रेनंतर कुर्लीच्या जत्रेने फोंडाघाट पंचक्रोशीतील यात्रोत्सवांना सुरुवात होते. त्यामुळे या जत्रेला विशेष महत्त्व आहे.
कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांच्या सीमेवर वसलेल्या कुर्ली गावातील धरण प्रकल्पामुळे संपूर्ण गाव बुडीत क्षेत्रात गेले. देवीचे मूळ मंदिरही पाण्याखाली गेले असून, देवीचे मूळ पाषाण आजही त्याच मंदिरात आहे. ग्रामस्थांनी अन्य ठिकाणी नव्याने मंदिर उभारले असून, तेथेच सध्या जत्रोत्सव साजरा केला जातो.

प्रतिक्रिया व्यक्त करा