You are currently viewing कोलगावच्या श्री देव कलेश्वराचा जत्रोत्सव २७ नोव्हेंबरला

कोलगावच्या श्री देव कलेश्वराचा जत्रोत्सव २७ नोव्हेंबरला

कोलगावच्या श्री देव कलेश्वराचा जत्रोत्सव २७ नोव्हेंबरला

पालखी मिरवणूक आणि आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार

कोलगाव :

येथील श्री देव कलेश्वराचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी देवाला अभिषेक व भाविकांना नारळ ठेवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रात्री १२ वाजता ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणूक काढण्यात येईल. त्यानंतर रात्री १ वाजता आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. या जत्रोत्सवाला भाविक व नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा