You are currently viewing सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवगृहाला नवी शीतकरण पेटी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवगृहाला नवी शीतकरण पेटी

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या शवगृहाला नवी शीतकरण पेटी

नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या पाठपुराव्याला यश; महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या निधीतून सुविधा उपलब्ध

सावंतवाडी

सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शवगृहातील गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने आता महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शवगृहासाठी अत्याधुनिक नूतन शव-कूलिंग पेटी उपलब्ध करून देण्यात आली असून, आमदार प्रतिनिधी तथा नगरसेवक देव्या सूर्याजी यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.
उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात असलेली जुनी शीतकरण यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याने मृतदेह सुरक्षित ठेवताना रुग्णांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी रुग्ण कल्याण समितीच्या बैठकीत हा विषय मांडला होता. तसेच नवीन शव-कूलिंग पेटी उपलब्ध होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा